पुणेकरांच्या भजनाचा ‘सृजन’मध्ये आवाज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

बारामती - गेले १२ दिवस सुरू असलेल्या भजनाच्या गजराचा कळसाध्याय रविवारी येथील मोरोपंत नाट्यगृहात झाला. ‘जय जय राम कृष्ण हरी’पासून सुरू होऊन ‘चला हो पंढरीसी जाऊ, जिवाचे जीवलगाला पाहू’ या अभंगाने कळस चढविला आणि वारी व पावसापूर्वीच वारकरी भक्‍तिवर्षावात चिंब झाले. जिल्हास्तरीय सृजन भजन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुणेकरांनी बाजी मारली. पुरुषांच्या गटात हडपसरच्या श्रीराम मंडळाने, महिलांच्या गटात पुण्याच्या स्वरपूजा मंडळाने तर बाल गटात पुण्याच्याच अचानक मंडळाने विजेतेपद पटकावले. 

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या एकसष्ठीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भरवलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातून २३२ संघ सहभागी झाले होते. लहान गट, महिला व पुरुष अशा तीन गटांत झालेल्या या स्पर्धेची पुणे विभागाची पहिली फेरी हडपसरला, आंबेगाव विभागाची फेरी मेंगडेवाडीला तर बारामती विभागाची फेरी येथील रयत भवनात झाली.

स्पर्धेतील विजेते - पुरुष गट- द्वितीय- गुरुदत्त भजनी मंडळ, कवठे येमाई, तृतीय- ज्ञानदेव संगीत विद्यालय, हडपसर, उत्तेजनार्थ- जय हनुमान भजनी मंडळ, ढेकळवाडी, गुरुकृपा प्रासादिक मंडळ डिंभे, आंबेगाव, स्वरसाधना भजनी मंडळ, बारामती. विशेष पुरस्कार- ज्ञानेश्वर भजनी मंडळ, खडकवाडी, काळू बाई प्रासादिक मंडळ, सुहास आटोळे भजनी मंडळ, खांडज. 

महिला गट- द्वितीय- सरस्वती भजनी मंडळ, बारामती, तृतीय- स्वरांजली महिला मंडळ, पुणे, उत्तेजनार्थ- स्वानंद महिला मंडळ, बारामती, विठ्ठल रुक्‍मिणी महिला मंडळ, खैरेवाडी व विठोबा प्रासादिक मंडळ, निरगुडसर. विशेष पुरस्कार- शारदा महिला मंडळ, शारदानगर.

बाल गट- द्वितीय- दत्त बाल भजनी मंडळ, गुनाट, तृतीय- साई भजनी मंडळ, पाटस, उत्तेजनार्थ- शारदा संगीत विद्यालय, शारदानगर, स्वरसाधना भजनी मंडळ, दिघी, जिल्हा परिषद शाळा भजनी गट, म्हाळुंगे-, खेड, विशेष पुरस्कार- सरस्वती भजनी मंडळ, बारामती, दत्तगणेश भजनी मंडळ, तळेगाव, बाल भजनी मंडळ, भोर.

उद्यापासून दररोज ‘साम’वर प्रसारण
जिल्हास्तरीय सृजन भजन स्पर्धेचे प्रसारण साम टीव्हीवर १९ जूनपासून ३० जूनपर्यंत दररोज दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या सर्व २७ भजनी मंडळांनी गायलेली भजने यानिमित्ताने पुन्हा पाहता येतील.

Web Title: srujan bhajan competition