दहावीची परीक्षा सात मार्चपासून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार दहावीची परीक्षा 7 मार्चपासून, तर बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या

https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पाहायला मिळेल, अशी माहिती मंडळाचे राज्य सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली. दहावीची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2017 दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च 2017 दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने तसेच शाळा/कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी-मार्च 2017 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्यामार्फत देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि मंडळातर्फे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना त्याबाबत कळविण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: SSC Exam started from March

टॅग्स