दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

पुणे : फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा 7 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत त्यांच्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे. यापूर्वी 29 ऑक्‍टोबर 2016 रोजी दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले होते. त्यावर हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या हरकती, सूचनांप्रमाणे दहावीच्या वेळापत्रकात आवश्‍यक बदल करण्यात आले आहेत. तर, बारावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दहावीचे सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा.

बारावीचे सविस्तर (सर्वसाधारण विषय) वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा.

बारावीचे सविस्तर (व्यवसाय अभ्यासक्रम) वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा.

Web Title: SSC, HSC timetable declared