बालशिक्षण मंदिरने शंभर टक्केची २८ वर्षाची परंपरा राखली

म. ए. सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला.
ssc result 2022 Balshikshan Mandir English Medium School 100 percent result since 28 years pune
ssc result 2022 Balshikshan Mandir English Medium School 100 percent result since 28 years pune sakal

कोथरुड : म. ए. सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयाने शंभर टक्के निकाल लागण्याची अठ्ठावीस वर्षांची परंपरा अबाधित राखली. यंदा शाळेचा विद्यार्थी आयुष अतुल इनामदार शंभर टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला. ऋचा पुष्कर फडतरे 98.6 गुण मिळवून शाळेत दुसरी तर मुलींमध्ये प्रथम आली. गिरिजा भुस्कुटे आणि रिया तलवारे या दोघी 98.4 गुण मिळवून शाळेत तिसऱ्या आल्या तब्बल 73 विद्यार्थी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

कोरोना काळात ऑनलाइन शाळा होती परंतु विविध खेळांमधून,उपक्रमांमधून दहावीचा अभ्यासही प्रभावी पद्धतीने घेतला गेला आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला असे विद्यार्थ्यांनी नमूद केले. शाळा ऑनलाइन असली तरीही सर्व शिक्षक शाळेच्या वेळेव्यातिरिक्तही कधीही शंकानिरसन करत होते. सातत्याने आमच्या अभ्यासाचा आणि प्रगतीचा आढावा घेत होते. त्यासाठी ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षा, लेखी परीक्षा शाळेने सतत घेतल्या हेच मुलांच्या यशाचे गमक आहे असे मत पालकांनी व्यक्त केले.

ऑनलाइन शिक्षण पद्धती आत्मसात करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणं हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान होते पण हे आव्हान ताबडतोप स्वीकारून त्याला सामोरे जाऊन आज लागलेला निकाल आणि विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ही शाळेसाठी खूप अभिमानास्पद बाब आहे असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली बोधनकर यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com