दहावी फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या होणार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै महिन्यात घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (ता.30) दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. तसेच त्याची प्रिंटही घेता येईल.

पुणे : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै महिन्यात घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (ता.30) दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. तसेच त्याची प्रिंटही घेता येईल.

ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या काळात विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे अर्ज करायचा आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC Supplementary Result 2019