दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २२.८६ टक्के 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २२.८६ टक्के लागला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० हजार ६६७ जण उत्तीर्ण झाले आहेत. मात्र एक लाख १८ हजार १६१ जणांना एटीकेटी सवलत मिळाल्याने ते अकरावी प्रवेशासाठी पात्र असतील. 

पुणे - राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २२.८६ टक्के लागला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० हजार ६६७ जण उत्तीर्ण झाले आहेत. मात्र एक लाख १८ हजार १६१ जणांना एटीकेटी सवलत मिळाल्याने ते अकरावी प्रवेशासाठी पात्र असतील. 

मंडळाने जुलै महिन्यात ही फेरपरीक्षा घेतली होती. त्याचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यभरातून दोन लाख २१ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालात किंचित घट झाली. गेल्या वर्षी या परीक्षेचा निकाल २३.६६ टक्के लागला होता. या परीक्षेतील गुणपडताळणी करायची असल्यास त्यांना ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या काळात विभागीय मंडळाकडे अर्ज करता येतील. 

खासगी आयटीआयचा पर्याय
दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया शुक्रवारी संपली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी त्यांना प्रवेश मिळणार नाही. परंतु खासगी आयटीआयची संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया १३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 

जागा केवळ तीस हजार
सर्व विषयांत उत्तीर्ण झालेले ५० हजार ६६७ आणि एक वा दोन विषयांत अनुत्तीर्ण होऊनही एटीकेटी सवलत मिळालेले एक लाख १८ हजार १६१ असे एकूण एक लाख ६८ हजार ८२८ विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या सुमारे ३० हजार जागाच रिक्‍त आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ssc supplementary result 22.86 per cent