पुणे - दहावीची परीक्षा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. यासाठीत ‘सकाळ’तर्फे ‘दहावी अभ्यासक्रम’ हा बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम राबवीत आहे. या अंतर्गत पहिल्या तीन महिन्यांत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेची संकलित पुस्तिका आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली असून, ती विक्रीसाठी उपलब्ध आहे.
‘सकाळ’मध्ये गेल्या दोन वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमावर आधारित लेखमाला प्रसिद्ध होत आहेत. नवा पॅटर्न लक्षात घेऊन अभ्यासक्रमातील सर्व लेख प्रसिद्ध केले जात आहेत. या वर्षी एप्रिलपासून लेखमाला प्रसिद्धीस सुरवात झाली असून, पहिल्या तिमाहीत प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या संकलनाची पुस्तिका ‘सकाळ’ने बाजारात उपलब्ध करून दिली आहे.
मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांतील लेखांचा पुस्तकात समावेश आहे.
या पुस्तकाची किंमत केवळ २० रुपये असून, ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयात आणि विक्रेत्यांकडे ते उपलब्ध आहे. अभ्यासात आपण कोठे आहोत, किती तयारी केली पाहिजे, याच्या अंदाजासाठी पुस्तक उपयुक्त आहे.
संपर्क - ९८८१५९८८१५
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.