हमखास यशासाठी मिळणार कानमंत्र; बारामतीत उद्या कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बारामती  शहर - बदललेल्या अभ्यासक्रमाची परिपूर्ण माहिती व्हावी व परीक्षेला कसे सामोरे जावे, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने रविवारी (ता. २६) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दहावीचा अभ्यासक्रम व परीक्षापद्धती बदलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत हमखास यश मिळावे व पुढील शिक्षण आनंददायी व सोपे व्हावे यासाठी सकाळने दहावी अभ्यासमाला सुरू केली आहे. या बदलांच्या मूलभूत स्वरूपाबाबत पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.

अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांचे बदललेले स्वरूप, मूल्यमापनाची पद्धत, प्रत्येक विषयाची कृतीपत्रिका कशी सोडवावी याबद्दल कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाईल. पुण्याच्या प्राजक्ती गोखले यांच्यासह प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, संदीप चोरडिया मार्गदर्शन करणार आहेत. एलआयसीचे विमा अधिकारी मिलिंद कळंत्रे हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. 

कार्यशाळा सर्वांसाठी खुली
कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. मात्र त्यासाठी मोबाईलद्वारे नोंदणी आवश्‍यक आहे. पालकांनी ०८०३०६३६४०८ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नावनोंदणी करावी. 

कधी व कोठे
ठिकाण - वसंतराव पवार नाट्यगृह बारामती (सांस्कृतिक केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमसमोर)
वेळ - सकाळी ११ वाजता
तारीख - रविवार २६ ऑगस्ट

Web Title: SSC Workshop on tomorrow in Baramati