चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला एसटी अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पारगाव - एसटीचालकाने प्रसंगावधान राखून बसवर ताबा मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमध्ये सुमारे २८ प्रवासी होते. ही घटना धामणी (ता. आंबेगाव) येथील भगतमळ्याजवळील ओढ्यावर घडली.

पारगाव - एसटीचालकाने प्रसंगावधान राखून बसवर ताबा मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमध्ये सुमारे २८ प्रवासी होते. ही घटना धामणी (ता. आंबेगाव) येथील भगतमळ्याजवळील ओढ्यावर घडली.

ओढ्यावर असलेल्या पुलावर लोणी-ठाणे एसटीची चाके घसरून एसटी पुलाच्या खाली फरपटत चालली होती. चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटीवर ताबा मिळविला. पुलाच्या संरक्षक दगडाला एसटीच्या चाकाचा ॲक्‍सल अडकून राहिल्याने एसटी पलटी होता होता वाचली. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास लोणी-ठाणे ही एसटी लोणीकडून धामणीकडे येत होती. भगतमळ्यातील पुलाच्या उतारावर एसटी आली असता नुकत्याच झालेल्या पावसाने रस्ता ओलसर होता. त्यातच पुलावर असलेला खड्डा चुकवत असताना एसटीचे चाके घसरून एसटी फरपटत ओढ्याकडे सरकली. परंतु एक चाक पुलाच्या बाहेर गेल्यानंतर पुलाच्या संरक्षक कठड्याला एसटी अडकल्याने पुढील दुर्घटना टळली, असे एसटीचे चालक भरत डुंबरे यांनी सांगितले. ओढा सुमारे पंधरा फूट खोल आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून एसटीत असलेल्या २८ प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही, असे धामणीचे सरपंच सागर जाधव व सचिन सोनवणे यांनी सांगितले. प्रवाशांना दुसऱ्या एसटीत बसवून दिल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने एसटी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

Web Title: ST Accident escaped due to condescension of the driver