एसटी भरधाव असताना चालक मोबाईलमध्ये दंग (व्हिडीआे)

STDRIVER
STDRIVER

वरवंड (पुणे) : काही एसटी चालक प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांना याचा अनुभव वारंवार येतो. बस चालविताना चालक मोबाईलचा वापर करत असल्याचे अनेकदा दिसून येते. सोमवारी (ता. 19) पुण्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या एसटीमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला.

सोमवारी सोलापूर महामार्गावरून (क्र. एमएच 14 बीटी 1026) ही एसटी अंदाजे चार वाजता हडपसरवरून इंदापूर दिशेला चालली होती. एसटीमध्ये प्रवाशांची संख्याही चांगली होती. मात्र, संबंधित चालकाचा करारनामा पाहून प्रवासी घाबरले होते. चालक एसटी भरधाव असताना खिशातील मोबाईल काढून बिनधास्त व्हॉटस्‌ऍप किंवा त्यामधील अन्य काही संदेश पाहत होता. वाहकही त्याला काही बोलत नव्हता. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या संबंधित एसटी चालकावर आगारप्रमुख किंवा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करीत होते.

एसटी चालविताना संबंधित चालकाने मोबाईल वापरणे चुकीचे आहे. यामुळे अपघात होऊ शकतो. संबंधित एसटी चालकावर कडक कारवाईसाठी संबंधित डेपोकडे अहवाल पाठविला जाईल.
सचिन शिंदे, एसटी आगार प्रमुख, स्वारगेट

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com