एसटीच्या प्रवाशांचा दिवाळी पाडवा कडू

st
st

पारगाव (पुणे) ; दिवाळी पाडव्याच्या दिवशी 40 किलोमीटरच्या आत तीन वेगवेगळ्या रस्त्यांवर एसटीच्या तीन गाड्या रस्त्यावर बंद पडल्या. त्यामुळे शंभरहून अधिक प्रवाशांना रस्त्यावर तास-दीड तास ताटकळत उभे राहावे लागले. त्यात महिला व लहान मुलांचे हाल झाले. 

दिवाळी पाडव्याच्या दिवशी (सोमवारी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी फाटा येथे एसटी बंद पडल्याने सुमारे 50 प्रवाशांना रस्त्यावर भरउन्हात ताटकळत उभे राहावे लागले. सण असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या इतर एसटी गाड्यांनाही गर्दी होती. त्यामुळे प्रवासी घेण्यासाठी कोणतीच एसटी थांबत नव्हती. त्यातून प्रवाशांना सुमारे दीड तास ताटकळत उभे राहावे लागले. काही प्रवाशांनी वेळेवर घरी जाण्यासाठी खासगी वाहनांची मदत घेतली. 

त्याच दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वडज (ता. जुन्नर) येथे जुन्नर-चिंचोली ही एसटी बंद पडली होती. त्यामधील सुमारे 20 प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला. त्याच दिवशी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील लांडेवाडी येथे राजगुरुनगर-असाणे ही एसटी रस्त्यावरच बंद पडली. त्यातील सुमारे 30 प्रवाशांना दुसऱ्या एसटीची वाट पाहत रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे एसटी महामंडळाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com