चला एसटीने जाऊ, साडेतीन पीठे डोळा पाहू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

असा आहे मार्ग 
साडेतीन शक्तिपीठांचा मार्ग पिंपरी-चिंचवड- कोल्हापूर-तुळजापूर-माहूरगड-वणी-पिंपरी-चिंचवड या मार्गावरून बस जाणार आहे. तीन ऑक्‍टोबरला गुरुवारी सकाळी सहा वाजता गाडी पिंपरी-चिंचवडहून निघेल. कोल्हापूरहून तीन ऑक्‍टोबला तुळजापूरला गाडी जाईल. तुळजापूरहून माहूरगडला चार ऑक्‍टोबरला शुक्रवारी पोहोचेल, पाच ऑक्‍टोबरला शनिवारी माहूरगडहून वणी या ठिकाणी जाईल, सहा ऑक्‍टोबरला रविवारी वणीवरून पिंपरी-चिंचवडला गाडी परतेल. पूर्ण प्रवासासाठी चार दिवसांचा असेल.

पिंपरी - नवरात्रीनिमित्त साडेतीन शक्तिपीठाच्या दर्शनासाठी पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगाराने भाविकांसाठी खास बससेवा सुरू केली असून, त्याचे आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे.  

पहिले पीठ कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी, दुसरे माहूरगडची श्री रेणुकामाता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी माता आणि अर्धेपीठ नाशिकची सप्तशृंगी येथे भाविकांना नवरात्रीत देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. बसची सेवा रविवारी (ता. २९) सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सकाळी सहा वाजता ही बस वल्लभनगर आगारातून निघणार आहे. चार दिवसांनी रात्री आठ वाजता बस आगारात परतणार आहे. बसचा पूर्ण तिकिटाचा दर दोन हजार २९५ आहे, तर अर्धे तिकीट एक हजार १५० रुपये आहे. भाविकांसाठी ऑनलाइन तिकीट बुक करण्याची सोय आहे. एसटीच्या एमएसआरटीसी ॲपवरूनही हे तिकीट बुक करता येईल.

देवीच्या पाचव्या माळेसाठी भाविकांची संख्या अधिक असते. त्यामुळे गाडीला काही प्रमाणात उशीर होऊ शकतो. भाविकांनी याची दखल घ्यावी. नागरिकांचा प्रतिसाद पाहून बस संख्या वाढविण्यात येईल. यासाठी ग्रुप बुकिंग महत्त्वाचे आहे.
- पल्लवी पाटील, आगारप्रमुख, वल्लभनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Navratra Tour Religious Place