एसटी महामंडळाची मालवाहतुकीची योजना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पिंपरी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येत्या काही दिवसांत पाचशे वातानुकूलित बस दाखल होणार आहेत, अशी घोषणा राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी (ता. 28) येथे केली. महामंडळामार्फत स्वस्त दरात माल वाहतूक करण्याची योजना विचाराधीन असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले. 

महामंडळाच्या वतीने कासारवाडी येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेमध्ये एसटी चालकांसाठी आयोजित सपत्निक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन रावते यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रावते म्हणाले, ""महामंडळाकडील सर्व बसगाड्या वातानुकूलित असाव्यात, असे माझे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून लवकरच एसटीच्या ताफ्यात पाचशे वातानुकूलित बस दाखल होणार आहेत. चार ते पाच दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन नंतर प्रत्यक्ष बस दाखल होतील. त्यापाठोपाठ पांढरकवडा, नाशिक, पालघर आणि गडचिरोली अशा चार ठिकाणी अद्ययावत चालक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. एका वेळी चार हजार चालकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता या केंद्रांची असेल.'' 

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी 25 टक्के आरक्षण असलेले ऑटो इंजिनिअरिंग महाविद्यालयही सुरू करण्यात येणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुण्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचीही घोषणा त्यांनी या वेळी केली. 

Web Title: ST Shipping Corporation plans