मुद्रांक शुल्क वाढतच चाललेय

Stamp Duty
Stamp Duty

आधी सेस, नंतर मेट्रोचा प्रत्येकी एक टक्‍के भार
पुणे - राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीतून जकात हटविल्यानंतर दस्तनोंदणीवर एक टक्का एलबीटीची आकारणी सुरू करण्यात आली. वास्तविक, जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू झाल्यावर तो रद्द होणे अपेक्षित होते. परंतु, एलबीटीचे रूपांतर सेसमध्ये (अधिभार) करून तो तसाच सुरू ठेवला. त्यामध्ये मेट्रो प्रकल्पाचादेखील एक टक्का अतिरिक्त भार टाकला. त्यामुळे दस्तनोंदणीवर विनाकारण सात टक्के मुद्रांक शुल्क नागरिकांना भरावे लागते. हा एक टक्‍का अधिभार कमी केव्हा होणार, या प्रतीक्षेत पुणेकर आहेत.

राज्यात दस्तनोंदणीवर २००५ मध्ये दहा टक्के मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) आकारले जात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क चुकवेगिरीला चालना मिळत होती. केंद्र सरकारच्या हाउसिंग पॉलिसीमध्ये ही करचुकवेगिरी कमी करण्यासाठी विविध विभागांच्या करांत कपातीची सूचना केली होती. त्यामध्ये मुद्रांक शुल्काचाही समावेश होता. ती शिफारस ग्राह्य धरून मुद्रांक शुल्क विभागाने दस्तनोंदणीवर पाच टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याचे मुद्रांक शुल्काचे उत्पन्न दुप्पट ते तिपटीने वाढले.

राज्य सरकारने महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीतील जकात रद्द केली. मात्र, महापालिकांचे उत्पन्न सुरू राहावे, यासाठी दस्तनोंदणीवर एक टक्का एलबीटी लागू केला. त्यामुळे पुण्यासह अन्य शहरांमध्ये सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाऊ लागले. 

दरम्यानच्या कालावधीत केंद्राने जीएसटी लागू केला. तेव्हा एलबीटी रद्द होईल, असे वाटले होते. परंतु, सरकारने एलबीटीचे रूपांतर स्थानिक करामध्ये केले. तसेच, एक टक्‍क्‍याची आकारणी सुरूच ठेवली. त्यानंतर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यामुळे दस्तनोंदणीवर आणखी एक टक्का अधिभार सरकारने लागू केला. त्यामुळे दस्तनोंदणीवर पाच अधिक स्थानिक कर आणि सेस, असा प्रत्येक एक टक्का, असे सात टक्के मुद्रांक शुल्क नागरिकांना भरावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com