कोरोनातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेकडून मदत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे सुमारे 18 हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.

पुणे - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करताना मृत्यू झालेल्या महापालिकेतील 44 कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्यास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली. मात्र, या मोहिमेत मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. 

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?​

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे सुमारे 18 हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. त्यातील सुुमारे एक हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील 44 जणांचा मृत्यू झाला. या मोहिमेत मरण पावलेल्यांच्या वारसांना 
आर्थिक मदत देण्याची घोषणा महापालिकेने केली होती. तसेच, कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेच्या सेवेतही घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, केवळ सप्टेंबर महिन्यात मृत्युमुखी पडलेल्या 15 जणांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार होता. मात्र, त्यात बदल करून मृत्यू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना 25 लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला मंजूर देण्यात आली आहे. 

'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Standing Committee recently approved a grant of Rs. 25 lakh each to the heirs of PMC employees