सोनोग्राफी, गर्भपात केंद्रांची पालिकेकडून तपासणी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - म्हैसाळ (जि. सांगली) येथील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारपासून शहरातील गर्भपात आणि सोनोग्राफी केंद्रांची कसून तपासणी सुरू केली. दिवसभरात 35 सोनोग्राफी केंद्रे आणि 3 गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली. बॉम्बे नर्सिंग ऍक्‍टनुसार आज दिवसभरात कोणतीही तपासणी करण्यात आली नाही. 

बेकायदा सुरू असलेल्या गर्भपात आणि लिंगनिदान प्रक्रिया रोखण्यासाठी सर्व केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्या आधारे ही तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 15 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

गर्भपात केंद्रांची तपासणी हा यातील सर्वांत संवेदनशील घटक आहे. आतापर्यंतच्या मोहिमांमध्ये सोनोग्राफी केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. या वेळी गर्भपात केंद्रांमधील गर्भपाताची तपशीलवार माहिती घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: start of the municipal inspection abortion centers