लेण्याद्रीला विविध विकास कामांचा प्रारंभ

दत्ता म्हसकर
सोमवार, 3 डिसेंबर 2018

जुन्नर -  श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथील गणपती देवस्थानच्या विविध विकास कामांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार शरद सोनवणे यांनी येथे दिले दिले. 

अष्टविनायक तिर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या यात्री निवास भाग दोन येथील मलनि:स्सारण प्रकल्प व पेव्हींग ब्लॉकच्या कामांचा भूमीपुजन समारंभ रविवार ता. 02 रोजी झाला.

लेण्याद्रि येथे भाविकांकरीता असलेल्या यात्री निवास भाग दोनमधील सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्याकरीता देवस्थान ट्रस्टने मलनि:स्सारण प्रकल्प उभारण्याचे ठरविले. या कामाचे भूमीपुजन आमदार शरद सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले. मलनिस्सारण प्रकल्प ३३ लाख ९४ हजार ३८९ रुपये व पेव्हींग ब्लॉक १४ लाख ६६ हजार ३२० रुपये खर्चाचे काम असून हे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार असल्याचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी सांगितले. यावेळी पोलिस पाटील कविता बिडवर्इ,अलका माळी,दत्ता शिंदे, सचिन वाळुंज, राजेश बिडवर्इ, देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत बिडवर्इ, भगवान हांडे, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवर्इ व कर्मचारी उपस्थित होते. 

गोळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच शारदा लोखंडे, सदस्य गणपत मेहेर यांनी गोळेगावच्या विविध विकास कामांचे प्रस्ताव सोनवणे यांना दिले. विश्वस्त जितेंद्र बिडवर्इ यांनी आभार मानले. 

Web Title: The start of various development work in lenyadri