या पाच जिल्ह्यातील उद्योगांची चाके लागली फिरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर कच्चा माल, मनुष्यबळ आदी आव्हाने पार करून उद्योगांची चाके आता गतिमान होऊ लागली आहेत. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूरमधील सुमारे ४० ते ६० टक्के उद्योग आता सुरू झाले आहेत.

पुणे - लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर कच्चा माल, मनुष्यबळ आदी आव्हाने पार करून उद्योगांची चाके आता गतिमान होऊ लागली आहेत. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूरमधील सुमारे ४० ते ६० टक्के उद्योग आता सुरू झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागात महापालिका क्षेत्र वगळता सुरू झालेल्या उद्योगांचे प्रमाण सुमारे ७० टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे; तर पुणे शहरातील उद्योग क्षमतेच्या सुमारे ४० टक्के सुरू आहेत, अशी जिल्हा उद्योग संचालक कार्यालयाकडे नोंद आहे. अन्नधान्य वितरण, औषध निर्माण, फाउंड्री, हातमाग, अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी; तसेच उत्पादन क्षेत्राबरोबरच सेवाक्षेत्रही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोल्हापूरमध्ये इचलकरंजी, शिरोली, सांगली, साताऱ्यात वाई, शिरवळ, फलटण, लोणंद, सोलापूरमध्ये अक्कलकोट रस्ता, चिंचोलीमधील; तर पुण्यात नऱ्हे, नांदेड फाटा, हडपसर, रामटेकडी, मुंढवा, गुलटेकडी, पर्वती, शिवणे, सिंहगड रस्ता येथील उद्योग काही प्रमाणात सुरू झाले. पिंपरी-चिंचवडमधील निर्बंध कमी झाल्यामुळे तेथील उद्योगही जोर धरू लागले आहेत.

Image may contain: one or more people, text that says "ऑर्डर हव्यात उद्योग सुरू झाल्यावर मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावेल, अंदाज होता. परंतु, काही प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र, मागणीअभावी अनेक कमी ऑटोमोबाईल भेडसावत मनुष्यवळही खराडी कामगारांची उपस्थिती ग्रामीण भागातील उद्योगांत राज्य सरकारने कामगारांच्या उपस्थितीवरील निर्वंध उठविले आहेत. १०० उपस्थिती आहे. पिंपरी चिंचवडमध्येही कामगारांची उपस्थिती टक्क्यांपर्यंत पोचली मात्र, पुणे शहर आणि लगतच्या उपस्थिती ३० ४० टक्क्यांपरयंत आहे. ऑर्डरचा प्रश्न 'वर्क फ्रॉम होम'वर भर हिंजवडी आणि आयटीच्या हजार आहेत. त्यात सुमारे साडेचार लाख आयटीमध्ये 40 टक्के उपस्थितीची परवानगी तरी, सध्या लाख हजार लोक प्रत्यक्ष उपस्थित सुमारे सव्वातीन लाख लोक फ्रॉम करत आहेत."

परराज्यांतील कामगारही काही प्रमाणात परतण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाजारपेठेत मागणी वाढल्यावर अल्पावधीतच उद्योगांमधील उत्पादन प्रक्रिया वेगाने सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
- सदाशिव सुरवसे, उद्योग सहसंचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: start the wheel of industry in these five districts