चांदणी चौकातील काम तत्काळ सुरू करा : बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

पुणे, ता. 8 : चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठी आतापर्यंत ताब्यात आलेल्या जागेवर तातडीने काम सुरू करावे, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच येत्या तीन महिन्यांत उर्वरित जागेचे भूसंपादन करावे, अशा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

चांदणी चौक येथील रस्त्याचे रुंदीकरण आणि उड्डाण पुलाचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लावा, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. या कामाचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, महापालिका आयुक्त सौरभ राव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी बापट यांनी या सूचना दिल्या. 

बापट म्हणाले, ""चांदणी चौक विस्तारीकरणाच्या कामासाठी जी जागा ताब्यात आली आहे, त्या जागेवर तातडीने प्राधिकरणाने कामाला सुरवात करावी. तसेच उर्वरित जागा येत्या तीन महिन्यांत महापालिकेने संपादित करावी. काम सुरू करण्याबाबतचे पत्र महापालिकेकडून पुढील आठवड्यात प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होईल.'' 
 
Web Title: Start the work of Chandni Chowk Immediate: Bapat