कर्वे रस्त्यावरील बॅरिकेड काढण्यास सुरवात 

कर्वे रस्त्यावरील बॅरिकेड काढण्यास सुरवात 

पुणे - कर्वे रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी महामेट्रोने अखेर पावले उचलली आहेत. वनाज- रामवाडी मार्गावर मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू असताना बॅरीकेडस दूर करण्यास महामेट्रोने मंगळवारपासून सुरवात केली. कर्वे आणि पौड रस्त्यावरील बॅरीकेडस मार्चअखेरपर्यंत काढणार आहे. 

कर्वे रस्त्यावर आणि पौड रस्त्यावरून एलिव्हेटेड मार्गावरून मेट्रो धावणार आहे. या रस्त्यावर मार्गासाठीचे खांब उभारताना  दुतर्फा महामेट्रोने बॅरिकडेस लावले होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी पाच ते सहा मीटर रुंद जागा वाहतुकीसाठी होती. पीएमपीची बस त्यातून जाताना अन्य वाहन जाऊ शकत नव्हते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेला वाहनांच्या मोठ्या रांगा लागत होत्या. त्यामुळे चालक त्रस्त झाले होते. खांब उभारणीचे काम पूर्ण झाल्यामुळे आता गुजरात सोसायटी, कृष्णा हॉस्पिटल, आनंदनगर, आयडियल कॉलनी, एरंडवणा पोलिस चौकी, गरवारे महाविद्यालय ते सावरकर स्मारक दरम्यान बॅरिकेड्स काढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती वनाज- रामवाडी मेट्रो मार्गाचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com