चासकमान धरणातून विसर्ग सुरू ; धरण भरले 97 टक्के

राजेंद्र लोथे
शनिवार, 21 जुलै 2018

विशेष बाब म्हणजे मागील वर्षीही 21 जुलै रोजीच धरणातील पाणीसाठा 92 टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.

चास : खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चास कमान धरणातील पाणीसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला असून, खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी दुपारी धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात 5275 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता अशोक मुरुडे तसेच शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली.

विशेष बाब म्हणजे मागील वर्षीही 21 जुलै रोजीच धरणातील पाणीसाठा 92 टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. धरणात येणाऱ्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात येण्याची शक्यता असल्याने भीमा नदीकाठी असणाऱ्या नागरिकांना जलसंपदा विभागाचे वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Starting water flow from Chasamak dam Dam is filled with 97 percent