पियाजियो कडून गाडीखेलला जलसंधारण कामांना सुरवात

संतोष आटोळे
बुधवार, 9 मे 2018

शिर्सुफळ (पुणे) : गाडीखेल (ता.बारामती) येथे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातुन बारामती एमआयडीसी येथील पियाजियो व्हेईकल्स प्रा.लि.कंपनी तर्फे सीएसआर योजनेंर्तगत जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी गावामध्ये जलसंधारण कामांना सुरवात करण्यात आली. या कामाचा प्रारंभ सरपंच बाळासाहेब आटोळे यांच्या हस्ते करण्यात आली. 

कंपनीच्या माध्यमातुन गावामध्ये विविध पाणलोट विकासाची कामे राबविण्यात येणार आहेत यामध्ये सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना आगामी काळात वाहत जाणारे पाणी अडविणे व जमिनीत मुरविणे महत्त्वाचे ठरणार आहे. या धर्तीवर गावातील ओढ्याच्या खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट बंधारे, बांधबंदिस्ती, सलग समपातळी चर, आदी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सदर कामे पियोजो कंपनीच्या माध्यमातुन संजीवनी सक्षमीकरण व विकास संस्था औरंगाबाद यांच्या मार्फत केली जाणार आहेत. या कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

यावेळी सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासो जगताप, ग्रामपंचायत सदस्य शरद शेंडे, अनिल आटोळे, ग्रामसेवक अरुण जाधव, बबन आटोळे, दादा आटोळे, सुभाष शेंडे, केशव लोखंडे, पियाजियो व्हेईकल्सचे सीएसआर मँनेजर योगेश कापसे, संजिवनी संस्थेचे अभियंता आप्पासाहेब बोडखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन सर्वोतोपरी सहकार्य - बाळासाहेब आटोळे, सरपंच, गाडीखेल

दुष्काळ परिस्थितीचा सामना करीत असताना दुष्काळ कायम स्वरुपी हटविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये खाजगी उद्योजकांनी आपल्या सीएसआर फंडाच्या माध्यमातुन पुढाकार घेणे कौतुकास्पद असुन संबंधित कंपन्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल.

Web Title: starts working of irrigition from piagio company in gadikhel