पुणे : नाडी परीक्षण उपकरणाला ‘स्टार्टअप अ‍ॅवॉर्ड’; डॉ. अनिरुद्ध जोशींचा गौरव

डॉ. जोशींनी तयार केलेली ही उपकरणे सध्या बारा देशात वापरली जाताहेत.
Dr. Aniruddha Joshi
Dr. Aniruddha Joshi

पुणे : भारतीय औद्योगिक विश्वात नाविन्यपूर्ण संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेलं ‘स्टार्ट-अप इंडिया अवॉर्ड’ (StartUp India Award) पुण्यातील नाडी तरंगिणीचे निर्माते डॉ. अनिरुद्ध जोशी (Aniruddha Joshi) यांना जाहीर झाला आहे. त्यासाठी भारतातून 2,177 अर्ज आले होते. त्यातील 46 जणांना हा सन्मान जाहीर झाला आहे. (Startup Award for pulse testing equipment Pune Doctor Aniruddha Joshi Awarded)

Dr. Aniruddha Joshi
Video : समुद्राखाली ज्वालामुखीचा स्फोट; अमेरिकेच्या किनारपट्टीला त्सुनामीचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2016 मध्ये ही योजना सुरू केली. त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात-निर्यात अशा एकूण आठ क्षेत्रांचा समावेश आहे. एकविसाव्या शतकात देशाचे सामर्थ्य वाढविणार्‍या आणि जगभर उपयोगी पडू शकणार्‍या तरुणांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. त्यात प्रामुख्यांने तरुणांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला जातो. सन 2020 पासून आघाडीच्या संशोधकांना व उद्योजकांना वार्षिक हा अॅवॉर्ड सुरू करण्यात आला, याचं हे दुसरं वर्ष आहे. केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्रालयाकडून हा अॅवॉर्ड जाहीर केला जातो. कोरोना महामारीमुळं सर्व अॅवॉर्डप्राप्त संशोधकांना दिल्लीत न बोलावता शनिवारी दिल्लीत हे प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आले.

Dr. Aniruddha Joshi
19 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत पावसाची शक्यता : IMD

डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या नाडी तरंगिणीचे वैशिष्ट्य असे की, भारतातील प्राचीन आयुर्वेदातील मनगटावरील नाडी तपासून शरिरातील रोगाचे निदान करणे व उपाय सुचवणे हे काम त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने संगणकावर तसेच मोबाईलवरही बसवले. त्यांचे ‘स्टार्टअप इंडिया’ सन्मान मिळालेले ‘तुरीय’ नावाच्या उपकरणाद्वारे स्वत:च्या प्रकृतीबाबत रोजच्या रोज चना मिळतात. डॉ. जोशींनी तयार केलेली ही उपकरणं सध्या बारा देशात वापरली जात आहेत. तसेच याच्या आधारे एक लाख लोकांची शरीर व आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडे संकलित स्वरुपात उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com