‘स्टार्ट अप’द्वारे प्रगती साधा - माशेलकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे - ‘अनेक प्रतिभावंत तरुणी तंत्रज्ञानातही मागे नाहीत. त्यांनी नोकरीसाठी अडून न राहता स्टार्ट अपच्या माध्यमातून प्रगती साधावी,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.

कर्वेनगरमधील महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या भाऊबीज निधी शताब्दी वर्ष पदार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम संस्थेच्या रमा पुरुषोत्तम विद्या संकुल सभागृहात गुरुवारी झाला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र वंजारवाडकर यांनी सांगितले, की महर्षी कर्वे यांनी ही संस्था स्थापन करून समाजाला कायमस्वरूपी भाऊबीज दिलेली आहे. मनीषा कोपरकर यांच्या हस्ते निधीची थैली माशेलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यांनी ती भाऊबीज भेट मंडळाच्या कार्याध्यक्ष व महर्षी कर्वे यांची नात असलेल्या कुंदाताई नेने यांना दिली. माशेलकर यांच्या हस्ते भाऊबीज शताब्दी पत्रकाचे प्रकाशन व सामाजिक ई-लर्निंग ॲपचा शुभारंभ करण्यात आला. व्हिजन शाळेच्या अपर्णा देशपांडे, तसेच विमल कुलकर्णी व प्रतीक्षा विधाते या विद्यार्थिनींनी निधी संकलनाचे अनुभव सांगितले. नेने यांनी नव्याण्णव वर्षांपूर्वी गो. म. चिपळूणकर यांनी सुरू केलेल्या भाऊबीज निधीचा इतिहास कथन केला.  

सर्वाधिक निधी जमा करणाऱ्या स्वयंसेविका व गुणवान विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. वैशाली अनगळ यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या डॉ. माधुरी खांबेटे यांनी आभार मानले. शेवटी महिलाश्रम हायस्कूल व व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थिनींनी संपूर्ण वंदेमातरम्‌ गायले.

Web Title: Startup Development Raghunath Mashelkar