सदाकाळ यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

sadakal
sadakal

जुन्नर - करंजाळे ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उत्तम सदाकाळ यांना शिक्षकदिनी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार   समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.सातारा येथे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे उपस्थितीत सदाकाळ यांनी पुरस्कार स्वीकारला

यावेळी अभिनेते भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, आदेश बांदेकर तसेच प्राची साठे, संजीवराजे नाईक- निंबाळकर, वंदना कृष्णा, गंगाधर म्हमाणे, किरण लोहार, श्वेता सिंघल, डॉ.सुनील मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना व्हिडीओ द्वारा शुभेच्छा संदेश दिला. पुष्कर श्रोत्री यांनी आदेश बांदेकर व भरत जाधव यांची मुलाखत घेऊन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

सदाकाळ हे विनोदी लेखक व बालसाहित्यिक म्हणून परिचित आहेत. सकाळच्या गुदगुल्या सदरात त्यांच्या अनेक विनोदी कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. सद्या ते  करंजाळे येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.   

सदाकाळ हे विद्यार्थी प्रिय,उपक्रमशील प्राथमिक शिक्षक म्हणून सव्वीस वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी शिक्षण, कला, तसेच साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. शैक्षणिक कारकिर्दीत विदयार्थी घडवत असताना मुलांसाठी बालसाहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. बाल साहित्यिक असलेल्या उत्तम सदाकाळ यांची  बाल साहित्यासह एकूण 64 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com