स्टेट बॅंक ऑफिसर्सची पुण्यात त्रैवार्षिक सभा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पुणे - स्टेट बॅंक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनची (मुंबई सर्कल) त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा 25 व 26 फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोव्यातील सुमारे 1500 सदस्य सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनच्या मुंबई सर्कलचे अध्यक्ष अनिल नऱ्हे व सरचिटणीस रामकुमार सभापती यांनी दिली.

या वेळी स्टेट बॅंक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनच्या पुणे विभागाचे मुख्य प्रादेशिक सचिव दिगंबर वाघमारे, सभेचे जनसंपर्क व्यवस्थापक डी. व्ही. टाकळे, चैतन्य पावगी, अनंत तिनईकर आदी उपस्थित होते.
म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रस्त्यावर असलेल्या "गोल्डन लीफ' येथे संघटनेची ही सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेचे उद्‌घाटन ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कॉन्फिडरेशनचे अध्यक्ष व ऑल इंडिया स्टेट बॅंक ऑफिसर्स फेडरेशनचे सरचिटणीस वाय. सुदर्शन यांच्या हस्ते होणार आहे. उद्‌घाटन सत्रात लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सैनिक कल्याण निधीसाठी 10 लाख रुपयांची देणगी देण्यात येणार आहे.

रामकुमार सभापती म्हणाले, की नोटाबंदीनंतरच्या काळात बॅंक कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाची भरपाई देणे गरजेचे आहे. याबरोबरच पैशाच्या वाहतूक व सुरक्षेवरील खर्चाचीदेखील भरपाई देणे आवश्‍यक आहे. याशिवाय बॅंकिंग क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या संख्येचा प्रश्‍न महत्त्वाचा असून, त्वरित कर्मचारी भरती करण्याच्या मुद्द्यावर या सभेत चर्चा केली जाणार आहे. गेल्या दीड वर्षापासून वर्कमन डायरेक्‍टर व एम्प्लॉई डायरेक्‍टर यांच्या जागा रिक्त असून, त्या त्वरित भरण्याची गरज आहे. ग्रॅच्युईटीच्या रकमेचा मुद्द्यासंदर्भात कायद्यात बदल करणे आवश्‍यक आहे. हे सर्व मुद्दे आम्ही इंडियन बॅंक्‍स असोसिएशनसमोर मांडले असून, या मुद्द्यांसाठीच येत्या 28 फेब्रुवारीला एकदिवसीय लाक्षणिक संपदेखील पुकारला आहे.

Web Title: state bank officers meeting