बारावीचा मूल्यमापन आराखडा राज्य मंडळाकडून जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

राज्य मंडळाकडून बारावीच्या पूनर्रचित व नविन पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या नव्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे हा मूल्यमापन आराखडा राज्य  मंडळाच्या संकेतस्थळवर जाहीर केला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची सुधारित मूल्यमापन योजना, घटकनिहाय गुणविभागणी व अंतर्गत मूल्यमापन योजना याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भातील मूल्यमापन आराखडा राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य मंडळाकडून बारावीच्या पूनर्रचित व नविन पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या नव्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे हा मूल्यमापन आराखडा राज्य  मंडळाच्या संकेतस्थळवर जाहीर केला आहे.

इयत्ता बारावीच्या भाषेत्तर गटातील इतिहास, भूशास्त्र, राज्यशास्त्र, बालविकास, वस्त्रशास्त्र, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, पूस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन, चिटणीसांची कार्यपध्दती, सहकार, कृषीविज्ञान, माहिती तंत्रज्ञान-विज्ञान, कला व वाणिज्य, शिक्षणशास्त्र, पर्यावरण व जलसूरक्षा या विषयांच्या सुधारित मूल्यमापन योजनेची यंदा अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून सुरू करण्यात आली आहे. मंडळाने निश्‍चित केलेल्या सुधारित मूल्यमापन योजनेसाठी येत्या काळात शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात विषय शिक्षकांना विषयनिहाय मूल्यमापन आराखडे आणि अन्य तपशीलाची माहिती देण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे. राज्यातील सर्व विभागीय मंडळांनी या संदर्भातील माहिती कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांना त्वरित पाठवावी, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"बदलेल्या मुल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य यावर भर दिला गेला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रमाण वाढविल्याने विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान घेता येणार आहे. परंतु त्यांना मूल्यमापन पत्रिका (एक्टिविटी शीट) सोडविताना दिलेला कालावधी कमी पडणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी नक्कीच होणार आहे. अंतर्गत गुण असल्यामुळे या मुल्यमापनात विद्यार्थ्यांचा राज्य मंडळाच्या लेखी परीक्षेच्या दृष्टीने संपूर्ण अभ्यास व्हावा व त्यांचा अभ्यासक्रम आकलनशक्ती वाढावी यावर भर दिला आहे."
- अविनाश ताकवले, राज्य मंडळाचे अभ्यासगट सदस्य
 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Board announces 12th assessment plan