गैरप्रकारांना रोखण्यासाठी "कॉप' 

state election commission 'cop' application
state election commission 'cop' application

राज्य निवडणूक आयोगाचे पाऊल 

पिंपरी : काय म्हणालात? तुमच्या भागात उमेदवार पैसे आणि दारूचे 
वाटप करत आहे? किंवा भेटवस्तू देत आहे? मग, चिंता करू नका... 
राज्य निवडणूक आयोगाच्या "सिटिझन्स ऑन पॅट्रोल' (कॉप) या मोबाईल ऍपवरून तुम्हाला त्याची तक्रार दाखल करता येईल. या "ऍप'मुळे तक्रारदाराला गैरप्रकार तत्काळ थेट निवडणूक आयोगाला कळविणे शक्‍य होणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते. आत्तापर्यंत सुमारे पाच हजार नागरिकांनी हे ऍप "डाउनलोड' करून घेतले आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी "सिटिझन ऑन पॅट्रोल'(कॉप) हे मोबाईल ऍप तयार केले आहे. त्यासाठी तक्रारदाराला स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-आयडी देणे गरजेचे आहे. त्यानंतर, याच "ऍप'वरून तक्रारदाराला त्याच्या तक्रारीवरील कारवाई कळविली जाते. 

"प्ले स्टोअर'मधून ऍन्ड्रॉइड फोनवर हे ऍप "डाउनलोड' करून घेता येते. यामध्ये, तक्रारदाराचे नाव गुप्त राहते. परंतु, संबंधित ठिकाणाचे लोकेशन "ऍप'मधून आयोगाला समजू शकते. तक्रार दिल्यावर "कम्प्लेंट आयडी' तयार केली जाते. त्या तक्रारीची सद्यःस्थितीही तक्रारदाराला समजते. या ऍपच्या माध्यमातून सुज्ञ जनता उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू शकते. 

काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्र किंवा व्हिडिओ क्‍लिपसह त्याची तक्रार नोंदवू शकतात. यामुळे आता जनतेची नजर राजकीय नेत्यांच्या प्रत्येक कृतीवर राहणार आहे. आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ते सुलभपणे दाखल करू शकतात. त्यावरील कारवाईदेखील कमी वेळात करता येईल. निवडणूक सनियंत्रण समितीच्या देखरेखीखाली "कॉप'चे काम चालते. 

कोणत्या गोष्टींवर तुम्ही तक्रार देऊ शकता... 
- पैसे, भेटवस्तू किंवा सवलतींचे कुपन वाटप 
- मद्यवाटप 
- अग्निशस्त्र (बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्वर इत्यादी) 
- घोषणा व जाहिराती 
- बॅनर, फलक, पोस्टर, होर्डिंग्ज 
- सरकारी गाड्यांचा गैरवापर 
- इलेक्‍ट्रॉनिक मीडिया, पेड न्यूज, सोशल मीडिया, 
- प्रचार फेरी-सभा 
- प्रार्थना स्थळांचा उपयोग 
- लहान मुले, प्राण्यांचा वापर 
- भूमिपूजन व उद्‌घाटन समारंभ 
- ध्वनिक्षेपकाचा गैरवापर 
- प्रचार संपल्यावर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीत वास्तव्य करणे 
- मतदानाच्या दिवशी वाहनांचा वापर आणि इतर 


अशी आहे त्याची लिंक... 

http://Cramat.com/s/c/sqr2h 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com