राज्याला मद्यविक्रीतून आठ हजार कोटींचा महसूल 

गजेंद्र बडे
Tuesday, 1 December 2020

सात महिन्यांत २९ कोटी लिटर दारूची विक्री : बियरच्या विक्रीत घट 

पुणे : लॉकडाउनच्या मध्यापासून सुरू करण्यात आलेली दारु विक्री आणि त्यातून मिळणारा महसूल आता नियमित झाला आहे. गेल्या सात महिन्यांत सुमारे २९ कोटी लिटर दारुची विक्री झाली आहे. या विक्रीतून ७ हजार ८०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वार्षिक उद्दिष्टाच्या ४०.६१ टक्के महसूल मिळाला आहे. 

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

राज्यात सध्या देशी व विदेशी दारू आणि वाईनची विक्री पुर्ववत सुरू झाली आहे. बियरची विक्री अद्यापही कमीच आहे. पुर्वीच्या तुलनेत बियर विक्रीत  सुमारे ५० टक्के घट झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजेच सप्टेंबर, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत  दारुची विक्री नियमित झाली आहे. यामुळे त्यातून मिळणारा महसूलही पुर्ववत झाला आहे. या तीनच महिन्यात सुमारे १८ कोटी लिटर दारूची विक्री झाली आहे. 

लॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील काही दिवस दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र मे महिन्याच्या मध्यापासून ही दुकाने सुरू झाली आहेत. राज्यात दरमहा सरासरी सव्वासात कोटी लिटर दारूची विक्री होत असते. यानुसार वर्षात सुमारे ८७ कोटी लिटर दारूची विक्री होत असते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दारु विक्रीतून मिळणाऱ्या महसूलाचे चालू आर्थिक वर्षातील वार्षिक उद्दिष्ट १९ हजार २२५ कोटी रुपयांचे आहे. यापैकी ३० नोव्हेंबरपर्यंत ७ हजार ८०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हेच उद्दिष्ट १७ हजार ९७७ कोटी रुपयांचे होते. प्रत्यक्षात १५ हजार ४१९ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते, असे राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात देशी, विदेशी दारू आणि वाइनची विक्री मागील तीन महिन्यांपासून पुर्ववत सुरू झाली आहे. बियरची विक्री अजूनही पुर्ववत झालेली नाही. येत्या मार्चपासून बिअरची विक्रीही पुर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे -कांतीलाल उमाप, उत्पादन शुल्क आयुक्त, महाराष्ट्र राज्य.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state got revenue of Rs 8,000 crore from the sale of liquor