esakal | राज्यातील टोल कंत्राटदारांना मोठा दिलासा, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील टोल कंत्राटदारांना मोठा दिलासा, कारण...

-सरकारला टोल कंत्राटदारांची चिंता.
-नुकसानभरपाईसाठी द्रुतगती, जुना मुंबई रस्त्यावर वसुली मुदत ९६ दिवसांनी वाढवली.

राज्यातील टोल कंत्राटदारांना मोठा दिलासा, कारण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडानच्या काळात आणि त्यानंतरही धंदा बुडाल्यामुळे नुकसान झालेल्या राज्यातील टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई-पुणे रस्त्याचे टोल कंत्राटाची मुदत ९६ दिवसांनी तर मुंबई एन्ट्री पॉइंट टोल कंत्राटाची मुदत १९७ दिवसांनी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

दारु आणि इंग्रजी बोलण्याचा संबंध आहे का? ब्रिटनमध्ये झालं संशोधन​

गेल्या वर्षी २३ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले. रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद असताना केंद्रीय भूपृष्ठवाहन मंत्रालयाने संपूर्ण देशात टोलबंदी करण्याचा निर्णय घेतला. ही टोलबंदी २० एप्रिल २०२० यादिवशी रद्द करण्यात आली. त्यानंतरही रस्त्यावर वाहतूक खूप कमी झाल्याने या काळात त्यांना नुकसान सहन करावे लागले. यामुळे अस्वस्थ झालेल्या केंद्र सरकार आणि अर्थ मंत्रालयाने देशभरातील टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई देण्याचे धोरण ठरवले. ज्यामध्ये टोलबंदीच्या काळातील संपूर्ण तसेच लॉकडाउननंतर रहदारी ९० टक्के पातळीवर येईपर्यंतच्या काळातील नुकसानीच्या प्रमाणात टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई देण्याचे निकष या धोरणात ठरवले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने देखील त्यांच्या धोरणाच्या अखत्यारीत कंत्राटदारांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई पुणे रस्त्याचे टोल कंत्राटाची मुदत ९६ दिवसांनी वाढवण्याचा तर मुंबई एन्ट्री पाइंट टोल कंत्राटाची मुदत १९७ दिवसांनी वाढवण्याचा (१ मार्च २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी) तर सोलापूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या कंत्राटदाराला ३.२७ कोटी रुपये (२६ मार्च २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी) नुकसान भरपाई म्हणून देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयात सादर केला आहे.-

पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा प्रकार देशभर सुरू झाला असून करदात्यांचे काही हजार कोटी रुपये टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई म्हणून दिले जाणार आहेत. सर्वसामान्य माणसापासून उद्योगधंद्यांपर्यंत सर्वांनाच लॉकडाउनमुळे मोठा फटका बसला आहे, त्यांनी तो सहन केला असताना अशा प्रकारे एकाच घटकाला नुकसान भरपाई देणे म्हणजे उर्वरित सर्वांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. -विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image