परदेशात उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारची शिष्यवृत्ती

परदेशात उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारची शिष्यवृत्ती

पुणे - तुम्ही परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा संशोधनासाठी जात आहात का, तर मग जरा इकडे लक्ष द्या! राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या शिष्यवृत्तीसाठी एक जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

शिष्यवृत्तीचा अर्ज ‘www.maharashtra.gov.in,https://sjsa.maharashtra.gov.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह आयुक्‍त समाज कल्याण (शिक्षण शाखा), ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे -४११००१ या पत्त्यावर पाठवावा. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेतील शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती क्‍यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग ३००च्या आत असणाऱ्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com