रेडी-रेकनर दर वाढणार की, 'जैसे थे' राहणार? चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

the state government Will decide about the ready-reckoner rate increase or stay as it is.jpg
the state government Will decide about the ready-reckoner rate increase or stay as it is.jpg

पुणे : लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने चालू आर्थिक वर्षाचे ( 2020-21) रेडी रेकनरचे दर 31 मे 2020 पर्यंत जैसे थे ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आता ही मुदत समाप्त होत आल्याने नोंदणी व मुद्रांक विभागाने याविषयी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे राज्य सरकार रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवणार की वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्य सरकारकडून दर वर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. यापार्श्‍वभूमीवर 2020-21 या आर्थिक वर्षाचे रेडी रेकनरचे दर 1 एप्रिल ते 31 मे 2020 पर्यंत जैसे थे ठेवण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला होता. मागील दोन वर्षी रेडी रेकनर मधील दर "जैसे थे' ठेवत राज्य शासनाने नागरिकांना दिलासा दिला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा
यंदा मात्र पुढील वर्षीच्या (2020-21) रेडी रेकनरच्या दरात मुद्रांक शुल्क विभागाकडून 3 ते 18 टक्‍क्‍यांनी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहरात किमान दहा टक्‍क्‍यांनी, तर पुणे जिल्हयात काही भागात 15 टक्‍क्‍यांपर्यंत ही वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. नोंदणी विभागाकडून यंदा सर्वाधिक वाढ ही ग्रामीण भागात करण्यात आली आहे.

इंद्रायणी घाटावर गुंडांची दहशत; रात्रीच्या काळोखात लुटतायेत नागरिकांना

महानगरपालिका हद्दीत झालेल्या सदनिका, दुकाने यांच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारांच्या आधारे तीन ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली आहे. मात्र ज्या ठिकाणी खरेदी-विक्री व्यवहार नाहीत. त्याठिकाणी अथवा त्या भागात वाढ केली नसल्याचे मुद्रांक विभागातील सूत्रांनी सांगितले. हा प्रस्ताव मार्च महिन्यात पाठविण्यात आला होता. त्यावर राज्य शासनाने करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रेडी रेकनरचे दर एप्रिल ते मे या दोन महिन्यासाठी जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. आता ही मुदत समाप्त होत आल्याने नोंदणी विभागाने या विषयी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. आता यामध्ये रेडी रेकनरमध्ये वाढ करायची की नाही, किंवा रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवायचा याचा निर्णय राज्य शासन घेणार आहे. 

ऐकलतं का? आळंदीत लावले जातेय चोरून लग्न

''कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने रेडी-रेकनरचे दर 31 मेपर्यंत स्थगित ठेण्याचे आदेश दिले होते. ही मुदत संपत असल्याने या संदर्भात राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.''
- ओमप्रकाश देशमुख ( नोंदणी महानिरीक्षक) 

पुणेकरांनो, मार्केट यार्डातील भुसार बाजाराबाबत महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com