राज्य विमा रुग्णालयच सलाइनवर

अवधूत कुलकर्णी 
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पिंपरी - एक महिला तापामुळे उपचार करण्यासाठी रुग्णालयात गेली. मात्र, डॉक्‍टर उपलब्ध नसल्यामुळे उपचार मिळण्यासाठी वेळ लागला. पोटात दुखत असणारा एक रुग्ण उपचारासाठी इथे आला, पण रेडिओलॉजिस्ट नसल्याने त्याला खासगी रुग्णालय गाठावे लागले. अनेक दिवसांपासून चिंचवडमधल्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्यामुळे शहरातील रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात ‘सकाळ’ने नुकतीच पाहणी केली. त्या वेळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी आपली कैफियत मांडली. 

काय आहे स्थिती 
रुग्णालयात अनेक दिवसांपासून अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध नाही. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होते. रुग्णालयात अर्धवेळ डॉक्‍टर काम करीत असल्यामुळे रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळत नाहीत. रुग्णालयात अस्वच्छता पसरली आहे. रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नाही. 

आमच्याकडे हृदयरोगतज्ज्ञ आणि मूत्ररोगतज्ज्ञ नाहीत. सोनोग्राफीचे मशिन आहे. मात्र, रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे ती अनेक वर्षांपासून बंद आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षकपद अनेक दिवसांपासून रिक्‍त आहे. आमच्याकडे चार रुग्णवाहिका होत्या. अनेक दिवसांपासून त्या नादुरुस्त आहेत. 
- डॉ. राजीव कुंभारे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक,  राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, मोहननगर

रुग्णांची कैफियत
गेल्या आठवड्यात उपचार घेण्यासाठी इथे आलो असता, आमच्याकडे सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध नाही. तुम्ही वायसीएममध्ये जा, असा सल्ला दिला. रुग्णालयात औषधे उपलब्ध नाहीत, ती तुम्हाला बाहेरून आणावी लागतील, असे सांगितल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. 
- राहुल भिंगारदेव, रुग्ण, भोसरी

पाण्यावाचून अडचण 
ताप आल्यामुळे मी उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता पाणी मागितले होते. मात्र, आठ वाजल्यानंतर पाणी मिळेल, असे उत्तर मिळाले. 
- राणी राणे, दळवीनगर, चिंचवड 

Web Title: State Labor Insurance Scheme Hospital issue