सासवड-पालिका शाळेस राज्यस्तरीय पुरस्कार

श्रीकृष्ण नेवसे 
Wednesday, 13 January 2021

-सासवडच्या पालिका शाळेस राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार.
-शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या हस्ते झाला सन्मान.

सासवड : येथील सासवड शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 5 म्हणजेच संत नामदेव महाराज विद्यालयास राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मिळाला आहे. राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने हा सोहळा लोणवळा (ता. मावळ) येथे आयोजित केला होता. 

सात ते आठ कोटी डोसची दरमहा निर्मिती - आदर पूनावाला

सासवड (ता. पुरंदर) येथील ही नगरपालिका शिक्षण मंडळाची संत नामदेव महाराज शाळा विविध आघाड्यांवर उत्कृष्ट काम करीत आहे. शाळेत भौतिक सुविधांसह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम चांगला राबविला आहे. कोविड काळात शिक्षकांनी चांगले काम केले आहे. तळातील घटकातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानात शिक्षक व शाळेची भूमिका चांगली आहे. त्याचे वेळोवेळी कौतुकही झाले आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने या शाळेची पुरस्कारासाठी निवड झाली.

दरम्यान, हा सोहळा लोणवळा (ता. मावळ) येथे होताना.. सासवडचे सूपुत्र व पुरंदर-हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप हे ही उपस्थित होते. यावेळी शिक्षण विभागाचे पुण्यातील संचालक दत्तात्रेय जगताप, उपसंचालक औंदुबर उकीरडे, सहसंचालक मिनाक्षी शेंडकर, एसएससी बोर्डचे सहसचिव प्रिया शिंदे, सासवड पालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी विलास कदम, राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अर्जून कोळी, उपाध्यक्ष शिवाजी राजिवडे, संतोष देवकर, दत्ता खेडेकर आदी उपस्थित होते. 

या पुरस्कारानिमित्त सासवडचे नगराध्चययक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष निर्मला जगताप, माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप आदींनी शाळेत येऊन मुख्याध्यापिका कल्पना काटे, उपशिक्षक अरुणा नवगिरे, संगिता म्हेत्रे, माधुरी मुळीक, माधुरी बडदे, आनंद कदम, अलका मेमाणे, चारुशिला भोंगळे आदींसह शाळेचे कौतुक केले.

पुणे जिल्ह्यातील यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज

दरम्यान, आमदार जगताप कार्यक्रमात म्हणाले, ''शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत. हा बोजा कमी करुन शैक्षणिक कामांसाठी त्यांना मोकळीक द्यावी. या मागणीवर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दुजोरा देत मागणी विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले. तसेच कोरोना काळात शिक्षकांना राज्याला व एकुणच समाजाला खुप मदत केली. त्यामुळे ज्ञानदानासह शिक्षकांचे काम चांगलेच आहे.''

(संपादन : सागर डी. शेलार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State level award to Saswad-Palika School