माधुरी वेल्हाळ यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

award
award

मांजरी (पुणे) : हडपसर येथील माधुरी प्रमोद वेल्हाळ यांना सन 2017-18 चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पशु व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख दहा हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

वेल्हाळ यांनी 26 वर्षे शिक्षणसेवा केली आहे. त्यांनी विविध क्षेत्रात विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले. अनेक प्रशिक्षणातून त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शनाचे काम केले आहे. जिल्हा स्तरीय व राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत त्यांनी यश संपादन केले आहे. बालभारती पुणे येथे कार्यानुभव हस्तपुस्तीका परीक्षण, हस्तपुस्तिका निर्मिती, मित्राअॅपसाठी घटक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली असून, गणित या विषयावर राज्यस्तरीय कृतीसंशोधन केले आहे. त्यांची शब्दमाधुर्य (कविता संग्रह), जाणीव, गुणवत्तेसाठी नवोपक्रम, सप्ततारका, बहुमोल विचार, गृहपाठ माला ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकसहभागातून शालेय विकास साधला आहे. घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण यासारख्या कामात त्यांचे योगदान आहे.

वेल्हाळ म्हणाल्या,"हा पुरस्कार प्रेरणा देणारा व शैक्षणिक कार्याला गती देणारा आहे. मी केलेले काम आणि त्या कामाला इतरांचे झालेले सहकार्य यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. शिक्षण क्षेत्रात खूप मोठे योगदान देता येते, हे त्यानिमित्ताने जाणवले. म्हणून त्या  क्षेत्राचाच हा सन्मान असल्याचे मी मानते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com