Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांची जोरदार बॅटींग..... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांची जोरदार बॅटींग....

बारामती : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी जोरदार बॅटींग केली नाही, अस क्वचितच घडते. आज बारामतीतही अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या जलतरण तलावाच्या उदघाटनाच्या भाषणात अजितदादांनी आपल्या शैलीत स्पष्ट बोलत चौफेर बँटींग केली.

कार्यक्रमात दादांच्या अगोदर सुप्रिया सुळे यांनी भाषण केले. त्यात त्यांनी पवार कुटुंबियातील सर्वांनाच पोहोता येत...अस नमूद करत किस्सा सांगितला. लहानपणी ज्यांना बर पोहता यायच त्यांना ओढ्यात आणि ज्यांना येत नाही त्यांना डबा लावून विहीरीत ढकलून दिल जायच...त्या मुळे आमच्यापुढे पोहोण्याशिवाय पर्यायच नसायचा. पाण्यात पडल की पोहायला येत ही म्हण पवार कुटुंबियांतील मुलांना त्यामुळेच लागू पडते, असे त्यांनी हसत हसत नमूद केले. मुंबईत जलतरण स्पर्धांना माझी आई मला घेऊन जायची, याचे क्रेडीट मी आईलाच देईन कारण वडीलांना त्या काळात वेळच नसायचा, असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

हाच धागा पकडून अजित पवार म्हणाले, सुप्रियाने ओढयाचा उल्लेख केला, तो ओढा नव्हता फाटा होता. 33 फाटा.....त्यात आम्ही पोहायचो...त्यात उन तापायला लागल की पुन्हा बाहेर यायचो आणि त्या मातीत झोपायचो...राजूदादा तेच आठवण करुन देत होता...कशी मजा यायची....कसली मजा यायची...आता काय मजा येतीय ते बघू.....

माझ तर काही सांगूच नका...मी तर पाण्याला एवढा घाबरायचो की लांबूनच सगळ्यांची मजा बघत बसायचो...डबा बांधून वरुनच फेकून द्यायचे, मला तर भीती वाटायची त्या डब्याचा दोर तुटला तर तर काय होईल....पण आमच्या वरिष्ठांना काही वाटायच नाही...ते वरुन खाली फेकून द्यायचे....तेव्हापासून वरिष्ठ आमच्याशी अस वागतात....(प्रचंड हशा...) तरी आम्ही इथपर्यंत पोहोचलोय....खरच तुम्ही आमच कौतुक केल पाहिजे.....काय सांगायच आता तुम्हाला...

श्रीनिवास (अजित पवारांचे लहान बंधू) पोहायला शिकला आणि संध्याकाळी मला सांगितल दादा मी पोहायला शिकलो....रात्रभर मला झोपच आली नाही, दुस-या दिवशी गेलो आणि पोहायलाच शिकलो....धाकटा भाऊ पोहायला शिकला आणि आपण बिनशिकता कस चालेल...अशा गमतीजमती त्यांनी सांगितल्या.

अजितदादांच्या या फटकेबाजीतून राजेंद्र पवारही सुटले नाहीत. भाषणाचा शेवट करता करता दादा राजेंद्र पवारांकडे आले. आज तर काय जीनची पँट, टी शर्ट, बूट घातलेत...माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, पण मीच मोठा दिसतोय आणि हा लहान दिसतोय...आता राजूदादा आणि रोहित भाऊ भाऊ दिसतात...अस म्हटल्यावर सभागृहात हास्याच्या स्फोट झाला. तु एकट एकट सगळ करतोस...मला , सुप्रिया रोहितला पण जरा सांग काय काय करायच ते, आम्ही तुझ तु सांगशील ते सगळ ऐकू...अस म्हणताच पुन्हा सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.