खड्डे बुजविण्यासाठी डेडलाइन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

वारजे - वारज्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावर, तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने दररोज या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी थांबविण्यासाठी खड्डे त्वरित बुजवावेत, यासाठी प्रभाग क्र.३२ मधील राष्ट्रवादी चार नगरसेवकांनी महामार्ग प्राधिकरणाला चार दिवसांची मुदत दिली आहे. खड्डे बुजवले गेले नाही, तर आम्ही महामार्ग रोखून धरणार आहे, असे लेखी निवेदनही महामार्ग प्राधिकरणाला या नगरसेवकांनी दिले आहे. 

वारजे विकास कृती समिती व वारजे हायवे विकास प्रतिष्ठान, तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, दीपाली धुमाळ, सायली वांजळे यांनी हे निवेदन दिले आहे. या वेळी बाबा धुमाळ, निवृत्ती येनपुरे, राजीव पाटील, बाबा खान महामार्ग प्राधिकरणाचे मिलिंद वाबळे, रिलायन्स कंपनीचे बी. के. सिंग उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की चांदणी चौक ते वारजेदरम्यानच्या दोन्ही बाजूंचे सेवा रस्ते मृत्यूचा सापळा झाले आहेत. अनेकदा निवेदन देऊनसुद्धा या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. या रस्त्यावरुन नागरिकांना जीव धोक्‍यात घालून जावे लागत आहे. अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे व काहींचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरामधील कॉलेज, कंपन्या, आयटी कंपन्या, ऑफिसला जाणाऱ्यांना या खड्ड्यांमुळे व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे उशीर होत आहे. त्यामुळे हा रस्ता चर्चेचा विषय झाला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत दोन्ही सेवा रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण झाले नाही, तर या दिवशी स्थानिक नागरिकांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरणार आहोत. 

या रस्त्यांवरील खड्डे दोन दिवसांत पूर्णपणे बुजवू. तसेच येथील उड्डाण पुलाचे काम एका महिन्यात पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात येईल.
- बी. के. सिंग, रिलायन्स कंपनी

Web Title: State for Road Hole