राज्याला हवा पूर्णवेळ गृहमंत्री : सुप्रिया सुळे   

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 25 एप्रिल 2018

"राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री हवा आहे. अशी आमची पूर्वी पासून मागणी आहे."

- सुप्रिया सुळे

खडकवासला : "राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री हवा आहे. अशी आमची पूर्वी पासून मागणी आहे." असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

नॅशनल ब्युरोची माहितीनुसार, महाराष्ट्रात महिलांवरील अन्याय वाढत आहेत. गुन्हेदेखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूर्णवेळ गृहमंत्री नेमावा, अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. सध्या काश्मीर ते कन्याकुमारी पाहिले तर देशात कशाची चर्चा आहे. तर कास्टिंग काऊच, बलात्कार याची.

बलात्कारासारख्या विषयावर किती सहज बोलले जाते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महिलांची सुरक्षा ही देशात टॉपची प्रायोरिटी पाहिजे. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे यातून काय सुचवू इच्छित आहेत. महिलेला सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे हा तिचा अधिकार आहे. बलात्कार करणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, असेही सुळे यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: State want full time home minister says Supriya Sule