राजगडाच्या पायथ्याशी होणार शिवरायांचा अश्वारुढ पुतळा

मनोज कुंभार
Tuesday, 12 January 2021

शिवशंभू प्रतिष्ठान, राष्ट्रसेवा समुह व बारा गाव मावळ परिसरातील लोकसहभागातून उभारणार निधी.

वेल्हे, (पुणे) : स्वराज्याची पहिली राजधानी असलेला  राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाल येथील खंडोबाचा माळ या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असून, आज (ता. १२ जानेवारी) राजमाता जिजाऊ जयंती निमित्त या जागेवर भुमिपुजन करण्यात आले.

शिवशंभू प्रतिष्ठान अध्यक्ष महेश कदम, राष्ट्रसेवा समुहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, सरपंच गोरक्ष शिर्के व बारा गाव मावळ
परिसरातील नागरिकांच्या हस्ते भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला.

युवक दिन विशेष : कौशल्यासह हवा काम करण्याचा दृढ निश्‍चय

छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ वर्षापेक्षा अधिक काळ  राजगडावरुन राज्यकारभार केला. याच राजगडाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिक सहवास लाभला असून, याच राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या खंडोबाच्या माळावर चौथरा १३ फुट व अश्वारुढ पुतळा १२ फुट असे एकुण २५ फुट उंचीचा शिवरायांचा अश्वारुढ पुतळा लोकसहभागातून  उभारला जाणार आहे.

या पुतळा उभारण्याचे काम पुणे येथील शिल्पकार महेंद्र थोपटे, सुधाकर रणखांबे यांच्याकडून केले जाणार आहे. राजमाता जिजाऊं मॅासाहेबांची जयंतीच्या निमित्ताने राजगडाच्या पायथ्याशी शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यासाठीचे भुमिपुजन करण्यात आले.

यावेळी शिवशंभू प्रतिष्ठान कात्रजचे अध्यक्ष महेश कदम, राष्ट्रसेवा समुह धायरी अध्यक्ष राहुल पोकळे, शिल्पकार महेंद्र थोपटे, सुधाकर रणखांबे, पालचे सरपंच गोरक्ष शिर्के, अमोल मानकर, अतुल पवार, अंकुश उंबरठकर, सुरेश निगडे, राहुल ढेबे आदीसह परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा खंडोबाचा माळ या ठिकाणी शासनाच्या सर्व ठिकाणच्या परवानग्या घेऊनच केले जाणार आहे. यासाठी पत्रव्यवहार सुरु केलेला आहे. -राहुल पोकळे, अध्यक्ष राष्ट्रसेवा समुह

शिवप्रेमी व लोकसहभागातुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी मदत घेतली जाणार आहे -महेश कदम, शिवशंभु प्रतिष्ठान कात्रज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be erected near Raigad