आळंदीच्या साई मंदिरातून देवीची मूर्ती चोरीस 

संदीप घिसे 
शनिवार, 30 जून 2018

पिंपरी (पुणे) : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी चार लाख रुपये किंमतीची देवीची मूर्ती चोरून नेली. ही घटना आळंदीजवळील साई मंदिरात घडली.

पिंपरी (पुणे) : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी चार लाख रुपये किंमतीची देवीची मूर्ती चोरून नेली. ही घटना आळंदीजवळील साई मंदिरात घडली.

वसंत विठोबा गुंडपीकर (वय ६५ रा. स्वप्नपूर्ती बिल्डिंग, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीजवळील वडमुखवाडी-चऱ्होली येथे साई मंदिर आहे. बुधवारी (ता. २७) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास येथील साई मंदिराच्या आत असलेल्या दुर्गामाता मंदिराच्या गाभाऱ्यातील देवीची चार किलो वजनाची पितळी मूर्ती चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरून नेली. सतत वर्दळ असलेल्या या ठिकाणी चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक पगारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: statue of goddess stolen from sai temple