विश्‍वराजबागेत संत-तत्त्ववेत्त्यांचे पुतळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्त्यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात आले. विविध मान्यवरांच्या हस्ते हे पुतळे उभारण्यात आले. 
 

पुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्त्यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात आले. विविध मान्यवरांच्या हस्ते हे पुतळे उभारण्यात आले. 

संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, बाबा बुल्लेशाह, संत कबीर, प्लेटो, गॅलिलिओ, रामकृष्ण परमहंस, गुरू नानकदेव, भगवान महावीर, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, सेंट पीटर, नरसी मेहता, संत तुलसीदास, आद्य शंकराचार्य, महर्षी वेदव्यास, मोझेस, ऍरिस्टॉटल, कांट, हेगेल आदींचे पूर्णाकृती पुतळे मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात आले. 

या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप, किसन महाराज साखरे, माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान, मौलाना अब्दुल कलाम उर्दू विद्यापीठाचे कुलपती डॉ. फिरोज बख्त अहमद, तुळशीराम दादाराव कराड, मुस्लिम विचारवंत हजरत शेख बियाबानी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक, प्रा. रतनलाल सोनग्रा, श्रीलंकेचे बौद्ध साधक आनंद महाथेरो, फादर थॉमस डाबरे, डॉ. एडिसन सामराज, साधक श्रीकृष्ण ऊर्फ कर्वे गुरुजी, एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, प्रा. डॉ. मंगेश कराड, पं. वसंतराव गाडगीळ, काशिराम दादाराव कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, डॉ. आय. के. भट, डॉ. एस. एन. पठाण उपस्थित होते.

Web Title: Statues of saints philosophers in Vishwaraj Bagh