श्री लेण्याद्री गणपती देवस्थानला 'ब'वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा  

दत्ता म्हसकर
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला अशी माहिती अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनीं दिली.

जुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला अशी माहिती अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनीं दिली.

देवस्थानने तीन महिन्यांपूर्वी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. गोळेगावच्या ग्रामसभेत देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्ग दर्जा मिळण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. देवस्थानला यापूर्वी असलेला 'क' वर्ग दर्जा रद्द करून तीर्थक्षेत्राचा वरिष्ठ 'ब' वर्ग दर्जा दिला आहे. याबाबतच्या आदेशाचे पत्र उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांनी ग्रामविकास विभाग मुंबई येथे स्विकारले असल्याचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे व विश्वस्त संजय ढेकणे यांनी सांगितले.

बांधकाम विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता व उपसचिव मनोज जाधव यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी बांधकाम भवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत सदर प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. लेण्याद्री येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी देवस्थाने विविध मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात. तीर्थक्षेत्राचा वरिष्ठ 'ब' वर्ग दर्जा प्राप्त असणाऱ्या देवस्थानांना विकास कामासाठी ग्रामविकास विभागाकडून निधी प्राप्त होणार आहे. श्री क्षेत्र लेण्याद्रीचा सर्वांगीण विकास होण्यास व विविध विकास कामांस चालना मिळण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. 

देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्ग दर्जा प्राप्त झाल्याबद्दल ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंढे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे यांचे देवस्थानचे वतीने आभार मानण्यात  आले.देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्ग दर्जा मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. 

Web Title: The status of pilgrimage in 'B' class of Sri Lenidri Ganapati