आयुष्यात सतत नवे काही तरी शिकत रहा - डॉ. पोलार्ड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

येरवडा - ‘‘विद्यापीठातून पदवी घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर हे लक्षात असू द्यावे की, ज्ञान मिळविण्याची व काही शिकण्याची प्रक्रिया ही इथेच थांबत नाही. माणसाने आयुष्यभर सतत काही तरी नवे शिकत राहावे. या नियमच आपण आपल्याला घालून द्यावा,’’ असा सल्ला गयानाचे भारतातील उच्चआयुक्त डॉ. डेव्हिड पोलार्ड यांनी दिला.

अजिंक्‍य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात डॉ. पोलार्ड बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अजिंक्‍य पाटील, कुलगुरू ई. बी. खेडकर, रजिस्ट्रार बी. जी. भांडारकर, अभिनंदन थोरात, डॉ. अजय पाटील, डॉ. संतोष सोनवणे, डॉ. देबजानी दासगुप्ता, डॉ. रामर्थन गोपाल, डॉ. सैषा मिस्त्री, गणेश पोकळे, डॉ. दिलीप छाब्रिया, हृदय देशपांडे उपस्थित होते.

अजिंक्‍य पाटील म्हणाले, ‘‘जग व आपला देश सध्या डिजिटल होत आहे. यामुळे आपण सर्वांनी डिजिटल होणे गरजेचे आहे. हे विद्यापीठ याच गोष्टीसाठी कटिबद्ध असून संस्थेतील विद्यार्थी उद्याचे नेतृत्व करतील.’’ खेडकर यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. पदवीप्रदान समारंभात स्कूल ऑफ लॉ, स्कूल ऑफ बिझिनेस अडमिनिस्ट्रेशन, स्कूल ऑफ मीडिया व स्कूल ऑफ डिझाइनच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठीच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या.

Web Title: Stay away learning something new under the life