ट्रेकिंगद्वारे ‘स्टेप आउट’चा वर्धापन दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

वारजे येथील स्टेप आउट ट्रेकिंग ग्रुपचा दुसरा वर्धापन दिन नुकताच पार पडला. १८ नोव्हेंबर २०१७ ला निळकंठेश्‍वरच्या छोट्याशा ट्रेकने फील द नेचर अशी टॅगलाइन असलेल्या या ग्रुपची स्थापना झाली. दोन वर्षांत एकूण ३९ ट्रेक व ९०० हून अधिक गिर्यारोहकांनी सह्याद्रीच्या वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर जाऊन छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुरंदर, चावंड, रायरेश्‍वर, रोहिडा, रायगड व इतर अनेक किल्ल्यांवर ट्रेक केले आहेत.

वारजे - वारजे येथील स्टेप आउट ट्रेकिंग ग्रुपचा दुसरा वर्धापन दिन नुकताच पार पडला. १८ नोव्हेंबर २०१७ ला निळकंठेश्‍वरच्या छोट्याशा ट्रेकने फील द नेचर अशी टॅगलाइन असलेल्या या ग्रुपची स्थापना झाली. दोन वर्षांत एकूण ३९ ट्रेक व ९०० हून अधिक गिर्यारोहकांनी सह्याद्रीच्या वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर जाऊन छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुरंदर, चावंड, रायरेश्‍वर, रोहिडा, रायगड व इतर अनेक किल्ल्यांवर ट्रेक केले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

द्वितीय वर्धापन दिनानिमित्त नुकताच किल्ले राजगड येथे ट्रेक आयोजित केला होता. यामध्ये एकूण ३७ गिर्यारोहक सहभागी झाले होते. पुणे येथून निघून नसरापूर फाटा येथे असलेल्या स्वराज्याच्या विजय स्तंभाचा इतिहास जाणून सर्व सभासद राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे या गावात पोचले. नंतर चोर दरवाजामार्गे पद्मावती माचीवर प्रवेश करून राणी सईबाईंच्या समाधीचे दर्शन घेतले. पद्मावती देवीचे मंदिर, रामेश्‍वराचे मंदिर, पद्मावती तलाव, सुवेळा माचीवरील वेढे, संजीवनी माची या गडावरील ठिकाणाना भेटी देऊन तेथील इतिहास जाणून घेतला. बालेकिल्ल्यावर जाण्याचा थरार सर्व सभासदांनी अनुभवला. गडावर पाणी विक्रीस येणाऱ्या आजूबाजूच्या गावातील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. 

भविष्यात कळसुबाई, जीवधन यांसारख्या इतर अनेक किल्ल्यांवर ट्रेक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती स्टेपआऊटच्या संयोजिका कस्तुरी भालेराव यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: step out trekking group second anniversary celebration