पुणे-नाशिक महामार्गावर 37 लाख रुपयांचे सोने लुटले

राजेंद्र सांडभोर 
सोमवार, 2 जुलै 2018

राजगुरूनगर (पुणे) : पुणे नाशिक महामार्गावर शिरोली (ता. खेड ) गावाच्या हद्दीत, खरपुडी खुर्द फाट्याजवळ, हडपसर येथील घाऊक सोने व्यापाऱ्याला चालत्या दुचाकीवरून मारहाण करून पाडले आणि त्याच्याकडील तब्बल 37 लाख रूपयांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना काल (ता. 1) घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज मांगीलाल जैन (वय 40) हे हडपसर (पुणे) येथील रहिवासी असून त्यांचा घाऊक सोने दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. मंचर राजगुरूनगर येथील सराफांना सोन्याचे दागिने देण्यासाठी ते आपल्या टीव्हीएस वेगो दुचाकीवरून (क्र. एम.एच.12 पी. एल. 7569) पुणे नाशिक महामार्गावरून राजगुरुनगरकडे चालले होते. त्यावेळी पाठीमागून काळया रंगाच्या आणि नंबर नसलेल्या दुचाकीवरून तीन रंगाने सावळे आणि अंगाने सडपातळ असलेले चोरटे आले.

त्यापैकी एकाने लोखंडी रॉडने त्यांच्या उजव्या हातावर फटका मारला. त्यामुळे तोल जाऊन ते खाली पडले. ते तिघे त्यांच्याजवळ थांबले आणि एकाने पुन्हा जैन यांच्या हातापायांवर लोखंडी रॉडने मारहाण केली आणि त्यांनी घट्ट पकडून ठेवलेली, सोन्याचे दागिने असलेली सॅक हिसकावून घेतली. तोपर्यंत दुसऱ्याने त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली आणि ते राजगुरुनगरच्या बाजूला पळून गेले. जैन यांच्या सॅकमध्ये नाकातील चमक्या, अंगठ्या, नथ, चोख सोन्याचे तुकडे इत्यादी एकूण ३७ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: stole 37 lakhs tola gold from pune nashik high way