दौंड-एसटी बसवरील दगडफेकीत विद्यार्थी जखमी

A stone-leaking student was injured on the Daund-ST bus
A stone-leaking student was injured on the Daund-ST bus

दौंड (पुणे) : दौंड शहरात भारत बंद आंदोलनाच्या दरम्यान एसटी बस वर दगडफेक करून एका विद्यार्थ्यास जखमी करून बसचे नुकसान केल्याप्रकरणी मनसेच्या तीन पदाधिकार्यांसह एकूण पाच जणांवर दंगल करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील दैनंदिन व्यवहार मात्र सुरळित होते.

दौंड शहरात आज (ता. 10) सकाळी पावणेबारा वाजता दौंड-सिध्दटेक-दौंड ही एसटी बस (एमएच 20, डी.9030) दौंड आगाराकडे निघाली होती. त्यावेळी शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयाच्या पुढे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटसकर, तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, शहराध्यक्ष जमीर सय्यद, अजहर कुरेशी व एक अनोळखी तरूणाने बस थांबवून केलेल्या दगडफेकीत इयत्ता अकरावीच्या शास्त्र शाखेचा विद्यार्थी श्रीनाथ एन. साळुंखे (वय 17, रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) याच्या उजव्या पायावर जोरात दगड लागल्याने तो जखमी झाला. बस मधील इतर 3 विद्यार्थी व एक वयोवृध्द दांपत्य भीतीपोटी बाकाखाली लपल्याने ते बचावले. होले यांच्यासमोरील काच फुटली परंतु सुदैवाने त्यांना दगड लागला नाही. श्रीनाथ साळुंखे हा विद्यार्थी जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला उप जिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी जाण्याची सूचना केली. परंतु त्याची घटक चाचणी परीक्षा असल्याने त्याने आधी परीक्षेस जाणे पसंत केले.

मनसेने स्टंटबाजी करीत बसवर दगडफेक केल्यानंतर एसटी प्रशासनाने शहरात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांना दौंड पीक अप शेड येथे न येण्याची सूचना केल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. दरम्यान आज (ता. दौंड) सकाळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समजूतदार भूमिका घेत व्यापाऱ्यांवर दुकाने बंद करण्याची सक्ती न करता छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंधन दरवाढीचा सभा घेऊन निषेध केला. काँग्रेस पक्षाचे आत्माराम ताकवणे, अशोक फरगडे, करीम शेख यांच्यासह मनसे, पीआरपी, एमआयएम व काही संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. 

दगडफेक करणार्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल...

बसचे चालक शिवाजी होले यांच्या फिर्यादीनुसार सागर पाटसकर, सचिन कुलथे, जमीर सय्यद, अजहर कुरेशी व एक अनोळखी तरूण (सर्व रा. दौंड) यांच्याविरूध्द एसटी बसचे पंधरा हजार रूपयांचे नुकसान करण्यासह दंगल करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, एसटी बस अडविणे, बेकायदा जमाव करणे, जमावंबदी आदेशाचा भंग करणे, आदी गुन्हे दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार मारूती हिरवे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com