पुण्यात साखर संकुलात अडविला शेतकरी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 जानेवारी 2019

पुणे : एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती.

आंदोलक शेतकऱ्यांचा पोलिसांबरोबर भाषणासाठी गाडी लावून देण्यावरून वाद झाला. आंदोलक शेतकऱ्यांनी परिसरातील कचरा जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. दरम्यान राजू शेट्टी यांनी शेतरकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, अन्यथा आंदोलन मागे घेण्याचा इशारा शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांनी एकरकमी एफआरपीबाबत निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका यावेळी घेतली. 

सकाळी शेतकऱ्यांच्या आसूडाच्या कडकडाटात अलका टॉकीज चौकातून मोर्चाला आज (ता. २८) सकाळी सुरवात झाली होती. पुण्यात टिळक चौकात राज्यभरातून सुमारे एक हजार शेतकरी उपस्थित होते. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेचा सरकार विरोधात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. राजू शेट्टी यांनी डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरवात केली. मोर्चामध्ये राजू शेट्टींसह योगेंद्र यादव, रविकांत तुपकर देखील सहभागी झाले होते.

दरम्यान मोर्चामुळे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर काही काळ वाहतूक बंद होती. त्याचा जंगली महाराज रस्त्यावर वाहतूकीचा ताण येत होता. मोर्चा पुढे गेल्यानंतर मागील बंद वाहतूक सोडण्यात आली त्यामुळे वाहतूक कोंडी तासभर सुरळीत झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop the farmers' March in the sugar sugar complex of Pune