गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी - आ. लक्ष्मण जगताप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

वाल्हेकरवाडी (पुणे) : परिसरात गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची उभारणी केली आहे, त्याचबरोबर आम्ही आमचा शब्द पाळला असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाल्हेकरवाडी येथे केले.

वाल्हेकरवाडी (पुणे) : परिसरात गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची उभारणी केली आहे, त्याचबरोबर आम्ही आमचा शब्द पाळला असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाल्हेकरवाडी येथे केले.

वाल्हेकरवाडी येथे पोलीस चौकी व आठवडी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी काल (ता. 27) ते बोलत होते. यावेळी गटनेते एकनाथ पवार, चिंचवड वाहतुक विभागाचे निरीक्षक संजीव पाटील, विलास मडेगरी, नगरसेवक नामदेव ढाके, मोना कुलकर्णी, तुषार कामठे, श्यामराव वाल्हेकर, तुषार कामठे, अमोल थोरात, सुरेश भोईर, अभिषेक बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले, सचिन चिंचवडे, मोरेश्वर शेंडगे, शीतल शिंदे, बाळासाहेब ओव्हाळ, गजानन चिंचवडे उपस्थित होते.

अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर बोलतांना जगताप पुढे म्हणाले की, आरक्षण असणारे बांधकामे पाडलीच जातील, जे आरक्षणबाधित नसतील त्यांचे नियमित करण्याची प्रक्रिया सुलभ करून ती नियमित कशी होतील यावर विचार चालू आहे. त्याचबरोबर परिसरातील शाळा, स्मशानभूमी, उद्याने इ. ची आरक्षणे आहेत ती तातडीने मार्गी लावण्याचे काम करत आहोत. 

यावेळी नगरसेवक  सचिन चिंचवडे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारा पोलीस चौकी प्रश्न आम्ही प्राधिकरणाकडुन जागा विकत घेऊन मार्गी लावला आहे, परिसरातील नागरिकांना आणखी कश्या सोयीसुविधा पुरवता येतील या गोष्टीचा प्रशासन दरबारी आम्ही पाठपुरावा करत आहोत.त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांना निरोगी  भाजीपाला मिळावा यासाठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिवले यांनी तर प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी केले आभार सचिन चिंचवडे यांनी मांडले.
 

Web Title: for stoppin maladjustment there should be police station said by mla lakshman jagtap