प्राण्यांना पाणी पिण्यासाठी बांधलेल्या हौदाचा वापर कचऱ्यासाठी

रमेश मोरे
शनिवार, 17 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : उन्हाळा ऋतु पशु पक्ष्यांना अन्न पाणी मिळविण्यासाठी नेहमीच कमी आधिक प्रमाणात त्रासदायक ठरतो. पर्यावरण प्रेमी व प्राणी, पक्षीमित्र या काळात प्राण्यांचा उन्हाळा आल्हाददायक जाण्यासाठी सेवाव्रताने काम करताना या काळात पहावयास मिळतात.

माणसाला उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणपोई, फ्रिज सारख्या माध्यमातुन थंडगार पाणी पिण्यास मिळते. मात्र कडक उन्हाळ्यात  मुक्या प्राण्यांचे काय, त्यांचा ऊन्हाळा दिलासादायक व्हावा या संकल्पनेतुन यावर उपाय म्हणुन जुनी सांगवी प्रभागात पुर्वीच्या सत्ताधारी मंडळीकडुन व तत्कालिन स्थापत्य विभागाकडुन काही मोजक्या ठिकाणी रस्त्याकडेला मुक्या प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे हौद बांधण्यात आले. या मागील उद्देशाची सर्व स्तरातुन स्तुती करण्यात आली. मात्र हौद बांधल्यानंतर तो गेली दिड वर्ष एकदाही भरला गेला नाही.

सत्तांतरानंतर याकडे सध्याच्या व्यवस्थापनाचे साफ दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे मुळ उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. अनेकांच्या स्मरणातुन हा हौद गेला आहे.तर अनेकांना हा हौद कशासाठी बांधला हेच ठाऊक नाही.नागरीक मात्र याचा कचराकुंडी सारखा वापर करताना दिसत आहेत.तर प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.याची स्वच्छताही केली जात नाही. पावसाळ्यात याच हौदात पाणी साठुन राहिल्याने,डासांच्या उत्पत्तीवाढीस हा हौद कारणीभुत ठरतो.

Web Title: storage of drinking water for animals used for waste