आयटी क्षेत्रात भारताला आणखी सक्षम करण्यासाठी 'या' संस्थेने घेतला पुढाकार!

IT_Sector
IT_Sector

पुणे : सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (एसटीपीआय) मार्फत भारत सरकारने मंजूर केलेल्या 'सॉफ्टवेअर उत्पादनांवरील राष्ट्रीय धोरण अंतर्गत तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी नवनवीन योजना राबवण्यात येत आहे. यामुळे 'आयटी' क्षेत्रात भारताला आणखीन सक्षम बनविण्यास चालना मिळेल.

तसेच सॉफ्टवेअरच्या निर्यातीतही प्रगती मिळेल. याचाच एक भाग म्हणून एसटीपीआय पुणे तर्फे लवकरच नवीन 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (सीईई) स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती एसटीपीआय पुणेचे संचालक संजय कुमार गुप्ता यांनी दिली. एसटीपीआयच्या 29व्या स्थापना दिनानिमित्त नुकतेच वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशातील विविध भागांमध्ये असलेल्या एसटीपीआयच्या 60 केंद्रांनी सहभाग घेतला होता. यावेळी एसटीपीआय महाराष्ट्राचे केंद्र असलेल्या पुणे शहरात सुरू होणाऱ्या या प्रकल्पाबाबत गुप्ता यांनी माहिती दिली.

देशातील आयटी इंडस्ट्रीला उद्योग 4.0च्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशात 20 हून अधिक डोमेन-केंद्र स्थापित करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आयओटी, ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑग्मेंटेड व व्हर्च्युअल रिअॅलिटी, फिनटेक, वैद्यकीय तंत्रज्ञान, हेल्थ इनफॉर्मेटिक्स, गेमिंग अँड अ‍ॅनिमेशन, मशीन लर्निंग, डेटा, विज्ञान, सायबर सिक्युरिटी, चिप डिझायनिंग यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे नेतृत्व तयार करण्यावर भर दिला जात आहे.

तसेच पुण्यातील भोसरी येथे लवकरच 'ऑटोनॉमस इलेक्ट्रिक शेअर्ड मोबिलिटी' (एसीईएस) डोमेनसाठी 'सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य प्रशासन बरोबरच सीओईपी, टाटा मोटर्स, कायनेटिक आदींचा सहभाग असेल. तसेच यामुळे विविध स्टार्टअपला देखील चांगली संधी मिळणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

एसटीपीआय महाराष्ट्र आणि गोवा बाबत
- एसटीपीआय महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे प्रमुख केंद्र पुणे शहरात
- एसटीपीआय पुणे केंद्राच्या अंतर्गत राज्यातील सहा शहरांचा समावेश
- सॉफ्टवेअर निर्यातीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
- यामध्ये सॉफ्टवेअर निर्यातीत पुणे पहिल्या क्रमांकावर असून मुंबई दुसर्‍या त्यानंतर नागपूर व नाशिक शहर आहेत
- महाराष्ट्र व गोवा राज्यातील नोंदणीकृत सुमारे 900 आयटी कंपन्यांच्या माध्यमातून 2018 ते 2019 दरम्यान निर्यात महसूल सुमारे 85 हजार कोटी होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'एसटीपीआय' मार्फत ऑनलाईन सत्रांचे आयोजन

'एसटीपीआय' मार्फत ऑनलाईन सत्रांची मालिका आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विविध वक्ते नवीन तंत्रज्ञान, नव्या कल्पना आणि नव उद्योजकांसाठी लागणारे कौशल्य या विषयांवर माहिती देतील. तसेच विज्ञान, सायबर सिक्युरिटी, चिप डिझायनिंग, ईएसडीएम आदींचाही समावेश यामध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com